पंढरपूर येथे भिकारीच्या वेशात लपला
सिल्लोड, (प्रतिनिधी) : महिन्यापासून एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ग्रामीण पोलिसांनी रविवारी पंढरपूरमध्ये (जि. सोलापूर) बेड्या ठोकल्या. तो पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाई मंदिर परिसरात भिकाऱ्याचे वेश धारण करून राहत होता.
अनिल मनोहर मोहिते (रा. भवन ता. सिल्लोड) असे फरार आरोपीचे नाव असून तो सव्वा महिन्यापासून फरार होता. तालुक्यातील भवन येथील पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहते. आरोपी व त्याच्या साथीदार
महिलेच्या कुटुंबास सतत त्रास देत वाद घालत असे. ३ एप्रिलला घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेच्या घरात प्रवेश करून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तर या दरम्यान महिलेचा पती घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या पतीला मारहाण केली. यातच महिलेच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
दिलेल्या तक्रारीवरून आरोपी याप्रकरणी पीडित महिलेने त्याचा साथीदाराविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांकडून माहिती काढली. पंढरपूर येथील मंदिर परिसरात यात आरोपी सोलापूर जिल्ह्यातील भिकाऱ्याचे वेश धारण करून राहत असल्याची माहिती मिळाली. ग्रामीण पोलिसांचे पथकाने पंढरपूर गाठत सापळा लावून अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या.
-- ग्रामीण पोलिसांची कारवाई --
आरोपीला पकडण्याची ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायकुमार राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक मनीष जाधव, पोलिस कर्मचारी दीपक इंगळे, कडुचा भाग्यवंत, अनंत जोशी, संजय आगे, दीपक पाटील यांनी केली.













